
कुंभार्ली घाटात सुरक्षिततेच्या दृष्टीने उपायोजना आखाव्यात-शेखर निकम यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे वेधले लक्ष.
गुहागर-विजापूर मार्गावरील कुंभार्ली घाटात काही दिवसांपूर्वी कार दरीत कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.या घाटात गेल्या काही वर्षात वारंवार अपघात घडले असून हा घाट धोकादायक बनलेला असल्याने या घाटाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना आखण्यात याव्यात, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडून शासनाचे लक्ष वेधले आहे.
याचबरोबर मुंबई गोवा महामार्ग, कळंबस्ते रेल्वे फाटक येथे ओव्हरब्रीज, मतदारसंघातील रस्त्यांची झालेली दुरावस्था, कामथे उपजिल्हा रुग्णालय येथे २०० बेडचे सुसज्ज रुग्णालय उभारण्यात यावे, यासारख्या मागण्या मांडून शासनाचे लक्ष वेधले आहे.