
आज राज्याचा अर्थसंकल्प; तूट कमी करण्याचे आव्हान, अजित पवारांचा अकरावा अर्थसंकल्प.
उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार हे सोमवारी राज्याचा वर्ष २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नव्याने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प असून वित्तमंत्री म्हणून अजित पवार यांचा हा अकरावा अर्थसंकल्प असणार आहे.विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस विजय मिळवून देण्यात सरकारने दिलेल्या मोफत योजनांचा मोलाचा वाटा आहे.
मात्र यामुळे आधीच महसुली तूट असलेल्या राज्याच्या तिजोरीवर आणखी भार पडला आहे. त्यामुळे सोमवारी अर्थसंकल्प सादर करताना वाढता खर्च, महसुली तूट, राज्यावरील वाढते कर्ज, देणी आणि वाढत्या प्रशासकीय खर्चावर नियंत्रण याचे आव्हान वित्तमंत्र्यांसमोर असणार आहे.