सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वेच्या सहा स्टेशन वरील अडीअडचणी व समस्या मार्गी लावण्याचे मंत्री नितेश राणे यांचे आश्वासन.

कोकण रेल्वेच्या सहा स्टेशन वरील अडीअडचणी व समस्या मार्गी लावण्याबरोबरच आवश्यक सुविधा शासनाच्या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लवकरात लवकर पूर्ण केल्या जातील. कोकण रेल्वे वरिष्ठ अधिकारी, सीएमडी आणि प्रवासी समन्वय समिती यांचा येत्या काही दिवसांत स्टेशन पाहणी दौरा करू, तसेच रेल्वेच्या विविध जलद गाड्या आणि सिंधुदुर्ग व वैभववाडी स्थानकातील पीआरएस सिस्टीम बाबत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करून लवकरात लवकर तोडगा काढला जाईल.

सिंधुदुगनगरी येथे जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री कक्ष उद्घाटनानंतर कोकण रेल्वे प्रवासी समिती अध्यक्ष प्रकाश पावसकर व जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर यांनी मंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन कोकण रेल्वेच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. सा. बां. विभाग कणकवलीचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड तसेच रेल्वे प्रवासी संघटनेचे साई आंबेरकर, शुभम परब, संजय वालावलकर, स्वप्निल गावडे आदींसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button