
संगीत विशारद निकिता सावंत यांना कोकणरत्न पुरस्कार जाहीर.
चिपळूण येथील संगीत विशारद स्वरसिद्ध कला संगीत विद्यालयाच्या संचालिका सौ. निकिता निलेश सावंत यांना संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल शिव-भीम प्रतिष्ठानच्यावतीने कोकणरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.सौ.निकिता सावंत २०१६ पासून चिपळुणात संगीत विद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संगीताचे धडेदेत आहेत.
वडील श्री. प्रभाकर विठ्ठल झेंडे यांच्याकडून त्यांना लहानपणी कलेची आवड निर्माण झाली. श्री. मच्छिंद्र विश्वास बुवा यांच्याकडून त्यांनी गडहिंग्लज येथे संगीताचे शिक्षण घेतले. सध्या त्या चिपळुणात तीन वर्षाच्या लहान मुलांपासून ते अगदी ६५ वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांना संगीताचे धडे देत आहेत.www.konkantoday.com