
गुजराती जाहिरात महाराष्ट्रात बंद करा. अन्यथा…टेल खेचूएअरटेल कंपनीच्या गुजराती जाहीरातीवर मनसेचा आक्षेप
मराठीच्या मुद्यावर राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) पुन्हा आक्रमक झाली आहे. मुंबईतल्या मुलुंडमध्ये मराठी महिलेला गुजराती रहिवासी इमारतीत ऑफिससाठी जागा नाकारण्यात आल्याची घटना घडली होती.याप्रकरणात मनसेने दणका दिल्यानंतर इमारतीच्या सेक्रेटरीला माफी मागावी लागली होती. हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक झाली आहे. एअरटेल कंपनीच्या गुजराती जाहीरातीवर मनसेने आक्षेप घेतला आहे.
एअरटेल कंपनीविरोधात आक्रमक
एअरटेलच्या गुजराती जाहिरातीवर मनसेने आक्षेप घेतला आहे. एअरटेलने एक जाहीरात प्रसिद्ध केली असून यात मुंबईकरांसाठी गुजराती भाषेत आवाहन करण्यात आलं आहे. याविरोधात मनसे आक्रमक झाली आहे. महाराष्ट्रात जर #Airtel मराठी भाषेला स्थान देणार नसेल, आमच्यावर गुजराती भाषा लादणार असेल तर आम्ही महाराष्ट्रात ऐरटेलला स्थान देणार नाही. airtelindia ने त्वरित चुक सुधारून माफी मागा आणि गुजराती जाहिरात महाराष्ट्रात बंद करा. अन्यथा…टेल खेचू असा इशारा मनसे पदाधिकारी अखिल चित्रे यांनी दिला आहे
www.konkantoday.com