
मुंबईत गॅस पाईपलाईन लीक होऊन आगीचा भडका, गाड्या जळाल्या; तिघे होरपळले.
मुंबई गॅस पाइपलाइन फुटून भीषण आग लागल्याची घटना घडली. शनिवारी रात्री उशिरा घडलेल्या या घटनेत काही गाड्या जळून खाक झाल्या. तर तिघे जण गंभीररित्या होरपळले. यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.मरोळ परिसरात काल रात्री मोठी दुर्घटना घडली. गॅस पाइपलाइन फुटल्याने गॅस गळती झाली. जिथं गॅस गळती झाली तिथं आग लागून कार, ऑटो रिक्षा आणि दुचाकी जळून खाक झाले. या दुर्घटनेत तीन जण गंभीररीत्या भाजले. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
अंधेरीत शेर-ए-पंजाबजवळ ही घडना घडली असून महानगर गॅस पाईपलाईन लीक झाली. यानंतर लागलेल्या आगीचा मोठा भडका उडाला. यात दोन रिक्षा आणि एक चारचाकी गाडी जळून खाक झाले. यात गंभीर जखमी झालेल्या चालकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आगीच्या दुर्घटनेनंतर घटनास्थळी स्थानिक आमदारांनी दाखल होत आढावा घेतला. मेघवाडी व एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन प्रशासनाच्या सहाय्याने जखमींना रुग्णालयात नेलं