बालिकेवर अत्याचार करणार्‍या नराधमास तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा.

खेड तालुक्यातील एका गावातील बालिकेवर अत्याचार करणार्‍या प्रदीप बाळकृष्ण दळवी (३६, रा. वाडीजैतापूर-खेड) या नराधमास अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश पी. एस. चांदगुडे यांनी शुक्रवारी तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. ही घटना जून २०१७ मध्ये घडली होती. सरकार पक्षातर्फे ऍड. मृणाल जाडकर यांनी काम पाहिले.पीडित बालिका घरी जात असताना नराधमाने तिला लगतच्या झाडीत नेले.

त्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तिचा गळा दाबत ठार मारण्याची धमकीदेखील दिली. या बाबत पीडितेच्या आई-वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर नराधमास अटक करण्यात आली होती. सुनावणीत ७ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकील जाडकर यांचा युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने नराधमास सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. यामध्ये दंडाच्या रक्कमेचाही समावेश आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button