
फॅन्सी नंबर प्लेटला कायमचा चाप बसणार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांची माहिती.
दादा, काका, मामा, पवार, पाटील अशा प्रकारच्या फॅन्सी नंबर प्लेटला आता कायमचा चाप बसणार आहे. हाय सिक्युरिटी नंबर प्लेटने हे शक्य होणार आहे. देशात या एकाच प्रकारच्या वेगवेगळ्या वाहनांना नंबर प्लेट बसणार आहेत. गुन्ह्यात वाहनांचा वापर केला किंवा गुन्हा करून पळणार्याला शोधून काढण्यात या नंबर प्लेटचा महत्वाचा हातभार असणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने याची अंमबजावणी सुरू झाली आहे. जिल्ह्यातील २ लाख ११ हजार ४३२ वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवाव्या लागणार आहेत. त्यासाठी मार्च ऐवजी एप्रिल २०२ ची मुदवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यांनी दिली.
वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यांवर धावणार्या वाहनांची ओळख पटविणे तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (एचएसआरपी) बसवणे बंधनकारक केले आहे. तसे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी व नागरिकांच्या सरक्षिततेच्या दृष्टीकोनातून वाहनांना एचएसआरपी बसविण्याचे अनिवार्य केले आहे. परिवहन आयुक्त कार्यालयाचे २२ डिसेंबर २०२४ ला तसे पत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला दिले आहेत.www.konkantoday.com