
दुकानदारांना लावता येणार एकच फलक, चिपळूण नगर परिषदेची कारवाई.
प्रत्येक व्यापार्यांना आता आपल्या दुकानांच्या नावाचा केवळ एकच फलक लावता येणार आहे. जादा फलकांसाठी परवानगी घेवून नगर परिषदेकडे कर भरावा लागणार आहे. त्यामुळे सध्या येथील जास्तीचे फलक असणार्या दुकानदारांना नोटीसा देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. राजकारण्यांनाही फलक लावण्यासाठी परवानगी घेणे बंधनकारक आहे. परवानगीच्या फलकांवर बारकोड राहणार आहे. या सार्या प्रकारामुळे चिपळूण नगर परिषदेच्या तिजोरीत मोठी भर पडणार आहे.
दुकानदारांनी आपल्या दुकानांच्या नावाचे, आपल्या मालाची जाहिरात करणारे, लोकप्रतिनिधींनी त्यांना अपेक्षित फलक किती व कोठे लावावेत याची पूर्वीपासून नियमावली आहे. मात्र हे सर्व नियम सर्वजण धाब्यावर बसवत होते. तर नगर परिषदाही याकडे दुर्लक्ष करत होत्या.www.konkantoday.com