
जादा परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक करणार्या ‘त्या’ भामट्याकडून आतापर्यंत ५० लाखांची फसवणूक.
जादा परताव्याचे आमिष दाखवत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडत १४ लाख २८ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गजाआड केलेल्या शशिकांत विठ्ठल मिरजकर (५५, रा. भाईंदर, ठाणे) या भामट्याच्या फसवणुकीतील आकडा ५० लाखांच्या आसपास असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. आणखी १५ जणांना ऑनलाईन गंडा घालत त्यांना परताव्यापोटी दिलेले धनादेशही न वटल्याची माहिती समोर आली आहे.
भामट्याने मुंबई, पुणेतही फसवणुकीचे कारनामे केल्याचे निष्पन्न झाले आहे.शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास जादा रक्कम मिळवून देण्याचे आमिष दाखवत एकास १४ लाख २८ हजार रुपयांना गंडा घातल्याची तक्रार दाखल होताच येथील पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मुंबई येथे भामट्याच्या मुसक्या आवळल्या.www.konkantoday.com