
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्ह्यातील प्रवाशांच्या सेवेसाठी एकूण २२ नवीन आरामदायी एस.टी बसगाड्या दाखल.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्ह्यातील प्रवाशांच्या सेवेसाठी आज एकूण २२ नवीन आरामदायी एस.टी.बसगाड्या दाखल झाल्या. या बस सेवेचे लोकार्पण महिलांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. उदय सामंत प्रमुख उपस्थित होते.या नवीन बसगाड्यांमुळे जिल्ह्यातील प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि आरामदायी प्रवास करता येणार आहे. या बसगाड्यांचे वितरण खालीलप्रमाणे करण्यात आले आहे -दापोली डेपो – १० बसरत्नागिरी डेपो – ५ बसलांजा डेपो – ३ बसराजापूर डेपो – ४ बसलोकार्पण सोहळ्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी नव्याने दाखल झालेल्या एस.टी. बसमधून प्रवास करून प्रवाशांशी संवाद साधला आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.लांजा व राजापूर डेपो मध्ये दाखल होणाऱ्या बस चे लोकार्पण राजापूर – लांजा – साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण (भैय्या) सामंत ह्यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बोलताना मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, ‘रत्नागिरी जिल्ह्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी आणखी ३० नवीन बसगाड्या लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे प्रवास अधिक सुलभ, गतिमान आणि सुरक्षित होईल.’