
अपूर्वा किरण सामंत फॉउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानेप्रशासकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारे महिलाना सन्मान पत्र.
महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत लोक संचालित साधन केंद्र लांजा आणि अपूर्वा किरण सामंत फॉउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनी प्रशासकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारे महिलाना सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी श्री अंबरीश मिस्त्री, अपूर्वा किरण सामंत फॉउंडेशन चे सचिव कु. अपूर्वा किरण सामंत, CMRC च्या अध्यक्ष दीपाली राडीये तसेच इतर प्रशासकीय महिला वर्ग आणि महिला बचत गटातील महिला उपस्थित होत्या. यावेळी माविम च्या जिल्हा समन्वय अधिकारी अंबरीक्ष मिस्त्री यांनी माविम ची संकल्पना मांडली तर महिलांच्या सक्षमीकरणासाठी अपूर्वा फाउंडेशन सतत प्रयत्नशील असून महिलांचा आर्थिक आणि उद्योजकीय प्रगती ही अपूर्व फाउंडेशनच्या मदतीने नक्की पूर्ण करू असे आश्वासन अपूर्वा सामंत यांनी दिले. तसेच लांजा मधील महिलांकरिता गारमेंट उभारणार असल्याचे आश्वासन देखील अपूर्वा फाउंडेशन तर्फे देण्यात आले.
यावेळी महिलांनी त्यांच्या दैनंदिन आहारात सकस अन्नाचा व तीन रंगांचा आहाराचा समावेश करावा याकरिता तिरंगा थाळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बचत गटातील महिलांनी विविध प्रकारचे अन्नपदार्थ बनवून देण्यात आले. तिरंगा 40 स्पर्धेच्या विजेत्यांना अपूर्वा फाउंडेशन मार्फत रोख पारितोषिक देऊन सन्मानित देखील करण्यात आले.