गोळप कट्ट्यावर डॉक्टर दिलीप पाखरे शनिवारी साधणार ग्रामस्थांशी संवाद

रत्नागिरी, (वा.) : रत्नागिरी तालुक्यातील गोळप कट्टा येथे येत्या शनिवार दिनांक 18 मे रोजी सायंकाळी ६ ते ७.३० वाजता या वेळेत रत्नागिरीतील प्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट डॉक्टर दिलीप पाखरे हे ग्रामस्थांशी संवाद साधून आपल्या जीवनातील विविध क्षेत्रातील प्रवास विषद करणार आहेत. यावेळी त्यांच्याशी प्रश्नोत्तराचा कार्यक्रम ही संपन्न होईल गोळप येथील पाटणकर कार्यालय फिनोलेक्स फाटा येथे हा 55 वा संवादात्मक कार्यक्रम होईल. डॉक्टर दिलीप पाखरे यांनी प्रादेशिक मनोरुग्णालय तसेच जिल्हा शासकीय रुग्णालय येथे फिजिओथेरपिस्ट म्हणून उत्तम सेवा दिली आहे. त्यांचे अनेक शोध निबंध आणि पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत. वृत्तपत्रातून त्यांनी आरोग्यविषयक विपुल लेखन केले आहे. कोकण मराठी साहित्य परिषद तसेच आभार व संकल्प कला मंच या संस्थांमध्येही मौलिक योगदान दिले आहे. जीवनातील या वाटचालीतील अनुभवांचा प्रवास यावेळी ते कथन करतील. तसेच उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन शंका समाधान करतील. ग्रामस्थांनी या संवादात्मक कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गोळप कट्ट्याचे संयोजक श्री. अविनाश काळे यांनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button