केवळ ३ दिवस मोबाईल दूर ठेवा अन् चमत्कार पाहा; मेंदू होईल ठणठणीत! मिळेल मन:शांती!!

नागपूर : मागील काही वर्षांमध्ये स्मार्टफोन्सच्या वापरामध्ये विलक्षण प्रमाणात वाढ झाली आहे. आजकाल लहान मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत प्रत्येक जण फोनमध्ये गुंतलेला असल्याचे पाहायला मिळते. स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे झोपेवर, स्मरणशक्तीवर आणि बौद्धिक क्षमतेवर परिणाम होऊ शकतो असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे.

अलीकडच्या काळात सांधेदुखीसह स्नायूंशी संबंधित अनेक समस्या वाढल्या आहेत. लहान मुले स्मार्टफोनचा गरजेपेक्षा जास्त वापर करत आहेत. त्यामुळे लहान मुलांमध्ये हे स्नायूंशी संबंधित आजार वाढत असल्याचे पाहायला मिळते. स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे नैराश्यासोबतच अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून, त्याचा मेंदूच्या आरोग्यावरदेखील विपरीत परिणाम होतो. मात्र, तुम्ही केवळ तीन दिवस स्मार्टफोनचा वापर केला नाही तर तुमच्या मेंदूचे आरोग्य सुधारत असल्याची बाब एका संशोधनातून समोर आली आहे. ७२ तास स्मार्टफोनपासून स्वतःला दूर ठेवल्यास मेंदूच्या रासायनिक विज्ञानावर सकारात्मक परिणाम होत असल्याचे या संशोधनात म्हटले आहे. ‘कंप्यूटर इन ह्यूमन बिहेवियर’ नामक जर्नलमध्ये है संशोधन प्रकाशित झाले आहे.

*युवकांच्या मेंदूत झालेल्या बदलाचा अभ्यास करण्यासाठी एफएमआरआय स्कॅन करण्यात आले. मेंदूतील बक्षीस (रिवॉर्ड) व मोह (केविंग) याच्याशी संबंधित भागात सकारात्मक बदल झाल्याचे आढळले.

७२ तास स्मार्टफोनचा वापर टाळला तर व्यसनाच्या समस्येशी संबंधित भागात सकारात्मक बदल झाल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. यासाठी १८ ते ३० वयोगटातील २५ युवकांची निवड करण्यात आली.

मोबाइलचा वापर टाळलेल्या या युवकांच्या मेंदूतील फंक्शनल मॅग्नेटिक रेजोनेन्स इमेजिग (एफएमआरआय) स्कॅन केल्यानंतर त्यांची स्फार्टफोन पाहण्याची इच्छा कमी होण्यासोबत व्यसनाशी निगडित रसायनात बदल झाल्याचे आढळले.

* मेंदूच्या आरोग्यासाठी छोटो-छोटे डिजिटल ब्रेकआवश्यक असल्याचे हीडलबर्ग व कोलोन विद्यापीठातील संशोधकांनी म्हटले आहे.

व्यसनाशी संबंध स्मार्टफोनचा वापर टाळल्यास डोपामिन व सेरोटोनिनसारख्या न्यूरोट्रान्समीटरच्या स्तरामध्ये महत्त्वाचा बदल होतो. व्यक्तीची मनस्थिती, भावना वा परिणाम होतो. त्यामुळे मेंदूतील रासायनिक प्रक्रियेचा व्यसनाशी संबंध असल्याची बाब या संशोधातून स्पष्ट झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button