सोशल मीडियाचा गैरवापर* रोखण्यासाठी जिल्ह्यात सोशल मीडिया लॅब तयार-कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय दराडे.

सोशल मीडियाचा गैरवापर वाढत चालला आहे. यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. हे टाळण्यासाठी जिल्ह्यात सोशल मीडिया लॅब तयार करण्यात येत आहे. या लॅबमधुन काही आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडिओ, फोटो टाकणाऱ्यांवर 24 तास वॉच (लक्ष) ठेवण्यात येईल. यामुळे गैरप्रकारांना प्रतिबंध घालणे शक्य होणार आहे, अशी माहिती कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय दराडे यांनी दिली.वार्षिक तपासणीनिमित्त रत्नागिरी दौऱ्यावर आले असता ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड आदी उपस्थित होते. श्री. दराडे म्हणाले, पोलिस दलाच्या कामाकाजाचा आढावा घेण्यात आला. 100 दिवसाचा सात कलमी कार्यक्रम आहे. त्याची अंमलबजावणी होते की नाही, याचाही आढावा घेतला. चांगल्या पद्धतीने काम सुरू आहे.

अजून काही पोलिस ठाण्याचा आढावा घेण्यात येणार आहे. जिल्ह्यासह राज्यात पोलिस दलाने ड्रग्ज विरोधी लढा सुरू केला आहे. ड्रग्जची समुद्र मार्गे तस्करी होत असेल तर त्याबाबत पोलिस, कस्टम, तटरक्षक दल आदी संयुक्त गस्त घालुन त्यावर लक्ष ठेऊन आहे. जमीनवर कुठे तस्करी सुरू असेल तर त्याला प्रतिबंध घालण्यासाठी ठिकठिकाणी नाकेबंदी करून वाहनांची तपासणी सुरू आहे.

अंमलीपदार्थ हद्दपार करण्याच्यादृष्टीने पोलिस प्रयत्न करत आहे. सागरी सुरक्षेवरही आमचे बारीक लक्ष आहे. गस्तीसाठी पोलिस दलाकडे सात स्पीड बोटी आहेत. त्यांच्या माध्यमातून सागरी गस्त सुरू असते.सायबर क्राईममध्ये दिसवेंदिवस वाढ होत आहे. गुन्हेगार दरवेळी गुन्ह्याची वेगळी आणि अत्याधुनिक पद्धत वापरत आहे. परंतु त्यापद्धतीने पोलिस दल देखील अधिक स्मार्ट होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button