
वाद्यवृंद निर्मात्यांनी देखील केली सरकारकडे पॅकेजची मागणी
कोरोना महामारीचा फटका सांस्कृतिक क्षेत्राला बसला आहे. मागील १४ महिन्यांपासून कार्यक्रम होत नसल्याने राज्यभरातील लाखो कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. या परिस्थितीत आम्ही जगायचं कसं, असा सवाल कलावंत करत आहेत. राज्य सरकारने अन्य घटकांना जसे आर्थिक पॅकेज जाहीर केले तसे आपल्यालाही मिळावे, अशी मागणी वाद्यवृंद निर्मात्यांनी केली आहे.
मराठी व्यावसायिक वाद्यवृंद निर्माता संघ व कलानिधी समिती या संस्थेने राज्य सरकारकडे मदतीसाठी गाऱहाणे घातले आहे. कोरोना काळात लोककलावंत, वाद्यवृंद कलावंत, लावणी कलावंत, साऊंड आर्टिस्ट, बॅकस्टेज आर्टिस्ट यांचा रोजगार हिरावला गेला आहे. अनेकांनी साऊंड इक्विपमेंट, वाद्य खरेदी कर्ज काढून केली आहेत त्यामुळे ते अडचणीत आल्या आहेत
www.konkantoday.com