
विधान परिषदेत आरोप प्रत्यारोप नितेश राणे म्हणाले, कल्लू मामा गप्प बस, मातोश्रीची फरशी चाटतो, अनिल परबांचं जशास तसं उत्तर.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब यांनी संभाजीराजेंचा धर्म बदलण्यासाठी छळ झाला, माझा पक्ष बदलण्यासाठी छळ झाला, मला ईडी, सीबीआयच्या नोटीस आल्या असे वक्तव्य केल्यानंतर आज सत्ताधाऱ्यांकडून विधानपरिषदेत जोरदार राडा करण्यात आला.यावेळी नितेश राणे यांनी अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केल्यानंतर अनिल परब यांनीही जोरदार पलटवार करत प्रत्युत्तर दिले. या वादात सभागृहाचे कामकाज तीनदा तहकूब करण्यात आले.
वेलमधे उतरून अनिल परब यांच्या विरोधात सत्ताधाऱ्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली.कल्लू मामा गप्प बस, मातोश्रीची फरशी चाटतोनितेश राणे यांनी बोलताना अनिल परब यांच्या वादाचा संदर्भ मातोश्रीशी जोडला. ते म्हणाले की, महाविकास आघाडीची सत्ता असताना यांनी लोकांची घरे तोडली. कारकुनाचा कोणी छळ करू शकत नाही. यांनी केंद्रीय मंत्र्याला अटक केली. जैसी करणी वैसी भरणी आहे. मातोश्रीची फरशी चाटायच काम यांनी केलं. मातोश्री बाहेर झोपण्याचं यांनी काम केलं. यांना दाखवायचं आहे आपण किती शूर आहोत ते. यानंतर अनिल परब यांनी पलटवार करत जोरदार प्रत्युत्तर दिले.
चार चार खून आहेत यांच्या नावावर, मातोश्रीची चाटून चाटून पुढे आलेअनिल परब पलटवार करत म्हणाले की, चार चार खून आहेत यांच्या नावावर (राणे कुटुंब) आहेत. हे आम्हाला शिकवणार का? अशी विचारणा परब यांनी केली. ले लोक खुनी आहेत. मातोश्रीची चाटून चाटून पुढे आले, हे सांगणार का मला? अशा शब्दात नितेश राणेंनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला. परब म्हणाले की, संभाजी महाराज यांचा मान करणार नाही असं कोणी नाही. सभागृहात एक मंत्री अतिशय खालच्या भाषेत बोलतो हे योग्य नाही. यानंतर सभापतींनी आत्ताच्या चर्चेत असंसदीय संवाद झाला असेल तर तो काढून टाका, असे निर्देश दिले.