
राज्यात प्रीपेड वीज मीटरवर बंदी! इलेक्ट्रॉनिक मीटर बसवणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
वीजेच्या प्रीपेड मीटर गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांकडून बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे आता राज्यात यापुढे प्रीपेड मीटर बसवले जाणार नाहीयेत.यापुढे ग्राहकांना पूर्वीप्रमाणे पोस्टपेड इलेक्ट्रानिक मीटर देण्यात येणार आहेत. तसेच इलेक्ट्रॉनिक मीटर बसवणाऱ्या ग्राहकांना वीज वापराच्या शुल्कामध्ये 10 टक्के सूट दिली जाणार आहे. यासंदर्भातील निर्णय देखील घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
वीज ग्राहकांचा गेले काही दिवस प्रीपेड वीजमीटर बसवण्याला विरोध केला जात होता. ग्राहकांचा हा विरोध लक्षात घेऊन सरकारने प्रीपेड वीजमीटर बसवण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे आता यापुढे राज्यात प्रीपेड वीजमीटर बसवले जाणार नाही. आता ग्राहकांना पूर्वीप्रमाणे पोस्टपेड इलेक्ट्रानिक मीटर देण्यात येणार आहेत. तसेच जे ग्राहक इलेक्ट्रॉनिक मीटर बसवतील त्यांना वीज वापराच्या शुल्कामध्ये 10 टक्के सवलत दिली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली आहे.