
रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी सुरूबनात आगीमुळे झाडांचे मोठे नुकसान.
रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी सुरुबन या ठिकाणी गुरुवारी वनव्या मुळे आग लागली. दोन्ही ठिकाणी लागलेल्या आगीवर अग्निशमन यंत्रणेच्या माध्यमातून नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र काळबादेवी सुरुबनात लागलेल्या आगीने मोठे नुकसान झाले आहे. काळबादेवी येथील दत्त मंदिराच्या मागील बाजूला असलेल्या सुरुबनाला गुरुवारी आग लागल्याची घटना घडली. सकाळी लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आहे पण यश आले होते. मात्र काही वेळाने ही आग पुन्हा पेटली. पुन्हा लागलेल्या आगीने सायंकाळी रुद्रावतार धारण केला होता. पुन्हा आग लागल्याचे निदर्शनास येताच इथल्या ग्रामस्थानी पुन्हा अग्निशमन यंत्रणेशी संपर्क साधला. सायंकाळी पुन्हा लागलेल्या आगीत सुरूची अनेक झाडे जळून भस्मसात झाली.