
कर्नाटकात कत्तलीसाठी नेणाऱ्या गुरांची बेकायदा वाहतूक करणारे सहाजण ताब्यात
चिपळूण तालुक्यातील चिपळूण-गुहागर मार्गावर गणेशखिंड येथे सोमवारी मध्यरात्रीनंतर गुरांची बेकायदा वाहतूक करताना एक टेम्पो व चालकासह ६ जणांना ताब्यात घेण्यात आले असून या टेम्पोत सुमारे २१ गुरे आढळून आली असून गाडीसह एकूण ६ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सोमवारी मध्यरात्रीनंतर ३.३० वा. ही कारवाई करण्यात आली. ही गुरे वाहतूक करणारे कर्नाटकमधील असल्याचे उघड झाले आहे.
सदरचा टेम्पो चिपळूण ठाण्यात आणून पुढील कारवाईला सुरूवात केली आहे. त्या टेम्पोत चालक चन्नाप्पा कोकरे (रा. बोरगाव, वाळवा), इस्माईल जातकर, सलीम जातकर (रायबाग कर्नाटक, मोहम्मद शेख (उगार कर्नाटक), अल्ताफ शेख (ऐनापूर), रमजान खेचा (उगार) हे आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. ही गुरे कत्तलीसाठी उगार कर्नाटक येथे नेत असल्याचे समजले.
www.konkantoday.com