
मुंबई-गोवा महामार्ग नक्की कधी पूर्ण होणार? आमदार निलेश राणे यांचा सरकारला सवाल.
कुडाळ-मालवणचे आ. नीलेश राणे यांनी विधिमंडळ अधिवेशनात मुंबई-गोवा महामार्ग नक्की कधी पूर्ण होणार? असा सवाल सरकारला केला. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे 2018 साली जेव्हा कोकणात आले त्यावेळी रत्नागिरीमध्ये त्यांनी मुंबई-गोवा महामार्गासाठी साडेअठरा हजार कोटींची तरतूद केल्याचे सांगितले होते.त्यामुळे या साडेअठरा हजार कोटींपैकी मुंबई-गोवा महामार्गावर नेमका किती खर्च झाला? असा सवाल आ. राणे यांनी केला आहे.
आ. राणे म्हणाले, मुंबई-गोवा महामार्गावर आतापर्यंत नेमका किती खर्च झाला, हे लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला कळायला हवं, लोक आमच्या अंगावर यायला लागले आहेत. महामार्गाचे काम सुरू करून अनेक वर्ष लोटली आहेत. मात्र, अद्याप तो पूर्ण झालेला नाही. काही महिन्यांनी गणेश चतुर्थी येईल, चाकरमान्यांना आम्ही काय उत्तर द्यायचं? आपण अनेक महामार्ग बांधतो आहोत. नागपूर-गोवा हा शक्तिपीठ महामार्ग हा किती मोठा आहे. मुंबई-गोवा महामार्गापैकी सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यातील रस्ता चौपदरीकरण पूर्ण झाला आहे पण रत्नागिरीचा 100-150 किमीचा पॅच का पूर्ण होत नाही? हे आम्हाला कधीतरी सरकारने सांगणे गरजेचे आहे.
राज्यपालांच्या अभिभाषणातही राज्यातील रस्ते दर्जेदार करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. कोकणात सरासरी 4 हजार मिमी पाऊस पडतो. जिथे तीन इंच पाऊस पडतो तिथेही ग्रेड तोच वापरायचा आणि जिथे 4 हजार मिमी पाऊस पडतो तिथेही तोच ग्रेड वापरायचा, मग क्वालिटी कशी मिळणार? माझी माहिती अशी आहे, सार्वजनिक बांधकाम विभागात 18 हजार कोटीची बिले अजून दिली गेलेली नाहीत.
तिच बिले दिली गेली नाहीत तर नवीन रस्ते कसे करणार? रस्त्यांची दुरुस्ती कशी करणार आहोत? याचे उत्तर सरकारने द्यावे. आमच्याकडे 4 हजार मिमी सरासरी पाऊस पडतो, तेथे रस्ते दुरुस्तीसाठी पैसा मिळत नाही. एक काळ असा होता 2014 पूर्वी रस्ते दुरुस्तीसाठी पैसे मिळत होते, आता कोकणाला रस्ते दुरुस्तीसाठी एक कवडीही मिळत नाही. काँक्रिटचे रस्ते जेव्हा होतील तेव्हा होतील तुर्तास रस्ते दुरुस्तीसाठी तरी कोकणाला पैसे मिळणार का? असा सवाल