
मुंबई-गोवा महामार्गावर बसलेल्या मोकाट गुरांवर धडकून दुचाकीस्वार गंभीर जखमी.
मुंबई-गोवा महामार्गावर बसलेल्या मोकाट गुरांवर धडकून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास लांजा रेस्टहाऊसजवळ घडली.या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लांजा नगर पंचायत कार्यक्षेत्रातील कुवे वाघरेवाडी येथील मोरेश्वर चंद्रकांत वाघरे (३८) हा आपल्या दुचाकीने (एमएच.०८.एम ४७१३) लांजाहून कुवेकडे चालला होतो.
मात्र लांजा रेस्टहाऊस येथील जोईल यांच्या घरासमोर मुंबई-गोवा महामार्गावर काळोखात काही गुरे बसली होती. दुचाकीस्वार याच्या ही बाब लक्षात न आल्याने काळोखात बसलेल्या गुरांवर जाऊन दुचाकी धडकली. त्यानंतर या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला प्रथम लांजा ग्नामीण रुग्णालय येथे नेण्यात आले. यानंतर त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले