
सोशल मीडियावर फिरणाऱ्या आफवांमुळे बाजारपेठेवर झाला परिणाम
रत्नागिरीत काल दिवसभर राम आळी येथील बाजारपेठे बाबत एक मॅसेज फिरत होता त्यामध्ये काही व्यापाऱ्यांच्या दुकानांची नावे घालून त्यांना कोरोना झाला आहे त्यामुळे बाजारपेठेत जाऊ नका असे मेसेज विविध माध्यमांवर फिरत होते याचा परिणाम आज बाजारपेठेवर झाला असून अनेकांनी बाजारपेठे पासून लांब राहण्याचे ठरवल्याने अनेकजण बाजारपेठेत न आल्याने त्याचा परिणाम व्यापाऱ्यांवर झाला. अशा अफवां बाबत व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली व्यापारी संघटनेने देखील व्यापारी सदस्य नियम पाळून दुकाने उघडत आहेत गणपती सणाच्या तोंडावर अशा अफवांमुळे परिणाम होत असल्याचे सांगितले
www.konkantoday.com