
रत्नागिरी जिल्ह्यात अडीच लाखांच्या वर दुचाकी
रत्नागिरी जिल्ह्यात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे वाहनांच्या मानाने रस्ते अपुरे पडत असून त्यामुळे वाहतुकीची कोंडी व अपघाताचे प्रमाण वाढले आहे आरटीओ कार्यालयाच्या नोंदणीनुसार वाहनांची संख्या दिवसेन दिवस वाढत आहे वाढती लोकसंख्या आणि बँकांकडून सहजगत्या उपलब्ध होणार कर्ज यामुळे वाहने खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे वाहनांचा विचार करता रत्नागिरी जिल्ह्यात २,५४,७४४ एवढी दुचाकीची संख्या आहे ३८,९१० माेटर कार,१२,८३५जीप,१३,८३५रिक्षा,११,९४०चारचाकी डिलेव्हरी व्हॅन ७,९८५तीन चाकी डिलेव्हरी व्हॅन आहेत वाढत्या वाहनांच्या मानाने रस्ते व अन्य सुविधांकडे लक्ष न दिल्यास भावी काळात मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
www.konkantoday.com