जोतिबा देवस्थानचे प्राधिकरण करण्यात येईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा.

येत्या पंधरा दिवसांत वाडी रत्नागिरी (ता.पन्हाळा ) येथील जोतिबा देवस्थानचे प्राधिकरण करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुुरुवारी रात्री येथे केली.पन्हाळा किल्ला शिवकालीन पुर्ननिर्मितीच्या आराखड्यासही मंजुरी देत असून त्या कामासाठी जो निधी लागेल तो देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. आमदार विनय कोरे यांच्या पुढाकारातून ऐतिहासिक पन्हाळा गडावर साकारलेल्या १३ डी थियटर आणि पन्हाळगडाचा रणसंग्राम लघुपटाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर अध्यक्षस्थानी होते. पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषदेच्या या देखण्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक आदींसह मान्यवर उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले, कोरे आमदार झाल्यापासून जेव्हा केव्हा भेटतील तेव्हा जोतिबा देवस्थानच्या प्राधिकरणाची एकच मागणी करत आले आहेत. आजपर्यंत त्यात अनेकांनी अडथळे आणले परंतू आता वेळ आली आहे. मी तुम्हांला येत्या १५ दिवसांत या प्राधिकरणाची स्थापना करून देतो. शिवकालीन इतिहास हा नुसता वाचण्याचा नसून तो जगण्याचा दस्तऐवज असतो.

रायगडला गेल्याशिवाय आपले जीवन पूर्ण होत नाही तसेच या स्वराज्याच्या उपराजधानीला म्हणजे पन्हाळागडाला भेट दिल्याशिवाय जीवन पूर्ण होणार नाही एवढे महत्व या किल्ल्यास आहे. कोरे यांनी गडाचे ऐतिहासिक दस्तऐवज जमा केले. पूरातत्व विभागाच्या परवानगी घेवून गडाच्या विकासाचा आराखडा तयार केला. महाराष्ट्रातील हा पहिला किल्ला असेल की त्याची आम्ही शिवकालीन पुर्ननिर्मिती करु. त्यानिमित्ताने आम्हांला इतिहासाशी जोडण्याची अत्युच्च संधी मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button