
जिल्ह्यातील सर्व महिला व मुलींसाठी बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ दशकपूर्ती सोहळा रत्नागिरीत दुचाकी रॅली
बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ या भारत सरकारच्या उपक्रमाला दि. 22 जानेवारी 2025 रोजी दहा वर्षे पूर्ण झाली असल्याने रत्नागिरी जिल्हा पोलिस दल व जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार 6 मार्च रोजी सायंकाळी 5 वापोलिस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय रत्नागिरी येथून रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व महिला व मुलींसाठी बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ दशकपूर्ती सोहळा तसेच दुचाकी रॅली काढली.यावेळी रॅलीला संबोधित करताना पोलिस महानिरीक्षक संजय दराडे म्हणाले की, महिला या सावित्रीच्या तसेच जिजाऊंच्या लेकी असून त्यांचा सर्वांगीण विकास होणे महत्वाचे आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र संजय दराडे (भा. पो. से.), यांच्याहस्ते या दशपूर्ती रॅलीला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक, धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलिस अधिकारी व अंमलदार, जिल्हा महिला व बालविकास कार्यालय रत्नागिरी येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. रॅलीची सुरुवात पोलीस मुख्यालय कवायत मैदान ते जेल नाका माळ नाका, भाटये बीच, जयस्तंभ, रहाटाघर, नाईक फॅक्टरी, पेठ किल्ला व परत पोलिस कवायत मैदान अशी काढली होती.जिल्ह्यातील अनेक महिला व मुलींनी या दशकपूर्ती रॅलीमध्ये सहभाग घेतला होता.