लोकमान्य बाळ गंगाधर टिळक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील निर्लेखित साहित्य खरेदीसाठी देकार द्यावेत

रत्नागिरी, दि. 6 : प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नाचणे रोड यांच्या कार्यालयातील निर्लेखित साहित्य खरेदीसाठी, इच्छुकांनी देकार बंद पाकीटातून प्राचार्य, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयात दि. 12 मार्च रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत साहित्याची समक्ष पाहणी करुन आणून द्यावीत, असे आवाहन प्राचार्यांनी केले आहे.

संस्थेमधील निर्लेखित केलेले संगणक,प्रिंटर व इतर तदअनुषंगिक आय.टी.उपकरणे, इलेक्ट्रॉनिक्स यंत्रसामुग्री व फर्निचर यांची कोटेशन पध्दतीने विक्री करावयाची आहे. तरी इच्छुकांनी दि. 12 मार्च रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत समक्ष साहित्याची पाहणी करुन देकार लोकमान्य बाळ गंगाधर टिळक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयात सादर करावीत.000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button