
रत्नागिरी जिल्ह्यातील ६२ कासवांना लावले फ्लिपर टॅग
भारतीय वन्यजीव संस्था, कांदळवन कक्ष-दक्षिण कोकण विभाग यांच्यामार्फत सुरू असलेल्या सागरी कासवांच्या प्लिपर टॅगिंग प्रकल्पांतर्गत ६२ कासवांना टॅग लावण्यात आले आहे. गुहागर, वेळास, आंजर्ले किनार्यांवर अंडी घालण्यासाठी आलेल्या मादी कासवांना हे टॅग लावण्यात आले असून जिल्ह्यात २०० कासवांना टॅग लावण्यात येणार आहे. यामुळे कोकणात अंडी घालण्यासाठी येणार्या कासवांची दीर्घकालीन नोंद ठेवण्यास मदत होणार आहे.
फ्लिपर टॅग हे सर्वात सामान्य टॅग आहे. जगभरातील समुद्री कासवांना चिन्हांकीत करण्यासाठी वापरले जाते. हे धातूपासून किंवा प्लास्टकपासून बनविण्यात येतात. कासवाला पोहोण्यासाठी उपयोगात येणारे चार पर असतात. फ्लिपर्स टॅग हे पुढच्या दोन परांना लावले जातात. या टॅगवर विशिष्ट सांकेतिक क्रमांक असतो. आणि टॅग करणार्या संस्थेचे नाव व संपर्क क्रमांक असतो. ज्यामुळे ह कासव पुन्हा सापडल्यास टॅगवर नमूद केलेल्या माहितीवरून त्याची ओळख पटवता येते.
भविष्यात एका पराला इजा होवून पर तुटल्यास दुसर्या परावरील टॅग तसाच राहतो. फ्लिपर टॅगिंगमुळे कासव कोणत्या प्रदेशातून कोणत्या प्रदेशात जात आहे हे पुढच्या वर्षी विणीसाठी कुठे जात आहे, अशा स्वरूपाची दीर्घकालीन माहिती मिळते.फ्लिपर टॅगिंगमुळे समुद्री कासवांचा मागोवा घेणे, ओळखणे, निरीक्षण करणे शक्य होते.www.konkantoday.com