
माजी खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाच्या मर्यादा उघड,उद्धवसेनेचा कोकणातील आणखी एक माजी आमदार शिंदेसेनेत जाणार?
कोकणात उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेला लागलेली गळती थांबण्याची चिन्हे नाहीत माजी खासदार विनायक राऊत यांचे नेतृत्व ही गळती थांबवण्यास कमी पडत असल्याचे स्पष्ट दिसत आहेदापोलीचे माजी आमदार आणि सध्याचे उद्धव सेनेचे उत्तर रत्नागिरीचे जिल्हाप्रमुख संजय कदम आता शिंदेसेनेच्या वाटेवर आहेत.शिंदेसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यासमवेत त्यांची बैठक झाली असून, १३ मार्चला ते पक्षप्रवेश करतील, अशी चर्चा आहे.
माजी आमदार राजन साळवी, सुभाष बने यांच्यापाठेपाठ आता आणखी एक माजी आमदार उद्धवसेना सोडून शिंदेसेनेत जात आहे.ज्यांच्याशी संजय कदम यांचा प्रमुख राजकीय वाद होता, ते माजी मंत्री रामदास कदम यांच्यासह त्यांनी स्नेहभोजनही घेतले असल्याची चर्चा आहे. रामदास कदम यांच्या पालखी बंगल्यावर संजय कदम आणि रामदास कदम यांचे एकत्रित स्नेहभोजन झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.