
पोफळीच्या पूर्वेला सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये कोसळू लागला धबधबा
कोयना वीज प्रकल्पाच्या उल्लोळ विहीर किंवा पोफळीतील सर्जवेलला गळती लागून पुढे ईव्हीटीमध्ये येवून झिरपत असलेल्या पाण्यामुळे रविवारी पोफळीच्या पूर्वेला सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये धबधब्यासारखा पाण्याचा विसर्ग वाहू लागला. ऐन उन्हाळ्यात कोसळणार्या या पाण्यामुळे सारेच अचंबित झाले असले तरी अनेक वर्षापासून गळतीमुळे हा प्रकार सातत्याने घडत आहे.
गेल्या अनेक वर्षापासून ही गळती सुरू आहे. मात्र गळतीचे प्रमाण कमी असल्याने ती दुर्लक्षित राहिली. पावसाळ्यातही पाण्याचा विसर्ग होत होता. मात्र धबधब्याचे पाणी असेल म्हणून लक्ष दिले गेलेले नाही. मात्र आता काही प्रमाणात त्यात वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे.www.konkantoday.com