
कोकणात आणखी एक धक्का? नगराध्यक्षांविरोधात ‘अविश्वास’, शिंदे शिवसेना आक्रमक.
कोकणात गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन टायगर सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा मंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वात कोकणात उद्धव ठाकरे यांच्या साम्राज्याला सुरूंग लाण्याचे काम सुरू आहे.दापोली नगर पंचायतावरील ठाकरे गटाचे सत्ता देखील आता उलथवण्याचे काम शिंदेची शिवसेना करत आहे. येथील याआधीच ठाकरे गटाचे 14 नगरसेवक फोडण्यात आले आहेत. या 14 नगरसेवकांनी आपला वेगळा गट तयार करून शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. अशातच आता दापोली नगराध्यक्षांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव आणण्याची तयारी शिंदेची शिवसेना करत असल्याने येथील सत्ता आता धोक्यात आली आहे.
दापोली नगरपंचायतीत ठाकरे यांच्या शिवसेनेची सत्ता आता जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येथे शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेल्या 14 नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव रत्नागिरी जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केला आहे.