
कोंडगाव मुरलीधर आळी निकृष्ट पोषक खाद्य अहवाल वरिष्टाना सादर…..
राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत ह्यांची कार्यतत्परता...
मागील दोन दिवसापूर्वी कोंडगाव मुरलीधरआळी येथे शासनाच्या एकात्मिक बालविकास प्रकल्प अंतर्गत देण्यात येणारया पोषक खाद्यमध्ये कुजलेला उंदीर आढळला होता. त्यानंतर गावच्या सरपंच प्रियांका जोयशी व स्थानिक ग्रामस्थांनी याववर आवाज उठवीला होता.त्यामुळे राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत ही घटना कळविण्यात आली. त्यामुळे त्यांनी ताबडतोब या घटनेचा अहवाल रत्नागिरी जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागाकडे या गंभीर प्रकारबाबत अहवाल मागवीला.
यामुळे हा अहवाल आता संगमेश्वर गटविकास अधिकारी यांच्याकडून जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांना प्राप्त झाला असून ही राजस्थान येथील कोटा दाल मिल येथून हे खाद्य येत असल्याचे समजले. तसेच या एजन्सीच्या बेफिकीरपणामुळे शासनाची प्रतिमा मलीन होत आहे.त्यामुळे या अहवालात या संबंधित कंपनीवर कठोर कारवाई व्हावी अशी भूमिका मांडण्यात आली आहे.
राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत ह्यांनी केलेल्या कार्यतत्परतेमुळे संबंधित कंपनीवर कारवाई होणार हे आता निश्चित झाले आहे. त्यामुळे कोंडगाव सह परिसरातील नागरिकांनी यावर समाधान व्यक्त केले असून राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत ह्यांचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर THR बाबत आपण आवश्यक असणारे बदल शासन स्थरावर मांडणार असून लवकरच त्यावर कार्यवाही होईल असा विश्वास व्यक्त केला.