अतिक्रमण हटविण्याच्या कारवायांमुळे चिपळुणात व्यावसायिकाची न.प.वर धडक.

अतिक्रमणामुळे कारवाई झालेल्या येथील व्यावसायिकांनी सोमवारी नगर परिषदेवर धडक दिली. यावेळी पर्यायी जागा द्या, अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी लवकरच जागा देण्याचे आश्‍वासन त्यांना दिले आहे. तसेच कारवाई सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले.

गेल्या काही महिन्यांपासून शहरात वाढलेले अतिक्रमण व त्यामुळे निर्माण झालेल्या समस्या लक्षात घेता नगर परिषद आता ऍक्शन मोडवर आली आहे. त्यानुसार चार दिवसांपूर्वी शहरातील सुमारे १७५ अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. एवढेच नव्हे तर कारवाई केलेल्या जागी व्यावसायिक पुन्हा येवू नयेत म्हणून त्या जागा उकरून टाकण्यात आल्या आहेत. तसेच अतिक्रमणविरोधी पथकांची स्थापना करण्यात आली असून हे पथक दररोज शहरात फिरत आहे. त्यामुळे पुन्हा अतिक्रमण झालेले नाही.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button