
सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित रविवारी ‘स्वर वंदना’
रत्नागिरी, दि. ५ : महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ग्वाल्हेर घराण्याचे प्रसिध्द गायक गायनाचार्य कै. राजाराम बुवा नारायण पराडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जन्मदिनानिमित्त ‘स्वर वंदना’ हा नाट्यगीत गायनाचा कार्यक्रम रविवार दि. ९ मार्चरोजी सायं. ५.०० वाजता जयेश मंगल पार्क, थिबा पॅलेस रोड येथे होणार आहे, अशी माहिती संचालक बिभिषण चवरे यांनी दिली.
या मैफली मध्ये सूरमणि पं. श्रीपाद पराडकर, दीपा पराडकर साठे, पं. ललित पराडकर आणि मुग्धा भट-सामंत यांचे शास्त्रीय, उपशास्त्रीय,अभंग, नाट्यगीत गायन होणार आहे. त्यांना या मैफलीमधे हार्मोनियम साथ चैतन्य पटवर्धन, तबलासाथ हेरंब जोगळेकर, पखवाज साथ मंगेश चव्हाण, तालवाद्यसाथ अव्दैत मोरे करणार आहेत. या कायर्क्रमाचे लेखन केले आहे श्री. प्रदीप तेंडुलकर यांनी आणि निवेदन करणार आहेत सौ. दिप्ती कानविंदे.