
शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे
मुंबई:-शिवसेना विधिमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड झाली आहे. दरम्यान याआधी आदित्य ठाकरे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु होती. परंतु गटनेते पदाचा अनुभव, राजकीय अभ्यास, पक्षातलं स्थान लक्षात घेऊन एकनाथ शिंदेच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. शिवसेना आमदारांच्या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव सुचवले आहे.
तसेच शिवसेनेच्या प्रतोद पदी सुनील प्रभू यांचे नाव घोषित करण्यात आले आहे.
www.konkantoday.com