रत्नागिरी जिल्हा असोसिएशनन च्या वतीने आयोजित केलेल्या गुरुवर्य कै. संजय दिनकर झोरे यांचे स्मरणार्थ16 वी मिनी व पहिली किड्स राज्यस्तरीय धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धा.

बीबीमहाराष्ट्र आर्चरी असोसिएशनच्या अधिपत्याखाली रत्नागिरी जिल्हा असोसिएशनन च्या वतीने आयोजित केलेल्या गुरुवर्य कै. संजय दिनकर झोरे यांचे स्मरणार्थ16 वी मिनी व पहिली किड्स राज्यस्तरीय धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धा 2025 एसव्हीजेसीटी स्पोर्ट्स अकॅडमी डेरवण येथे दिनांक 28 फेब्रुवारी ते दोन मार्च या कालावधीत पार पडल्या. या स्पर्धा इंडियन रिकर्व व कंपाऊंड या तीन प्रकारात दहा वर्ष, तेरा वर्ष व पंधरा वर्षे खालील मुला मुलींच्या गटांमध्ये घेण्यात आल्या.

या स्पर्धे करता 35 जिल्ह्यातून सुमारे तेराशे खेळाडूंनी सहभाग नोंदवला. पहिल्या दिवशी सुमारे अडीचशे खेळाडूंचा सहभाग होता दुसऱ्या दिवशी सुमारे ८०० खेळाडूंनी सहभाग नोंदवला व तिसऱ्या दिवशी सुमारे अडीचशे खेळाडूंचा सहभाग होता. अतिशय भव्य व दिव्य अशा या स्पर्धा अभूतपूर्व ठरल्या. इतक्या प्रचंड संख्येने खेळाडूंचा सहभाग हा प्रथमच नोंदवला गेला. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी सावर्डे येथील पोलीस उपाधीक्षक श्री भागोजी औटी व आबासाहेब पाटील, महाराष्ट्र आर्चरी असोसिएशनचे सचिव श्री प्रमोद चांदुरकर, तसेच एस व्ही जे सी टी स्पोर्ट्स अकॅडमी चे क्रीडा संचालक श्री श्रीकांत पराडकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री राजेन्द्र चव्हाण व जिल्हा आर्चरी असोसिएशनचे अध्यक्ष श्री सुरेश साळवी उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत रत्नागिरी जिल्हा आर्चरी असोसिएशनच्या सचिवा समिधा झोरे यांनी केले.

पोलिस उपाधीक्षक श्री औटी साहेबांनी खेळाडूंना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले व पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. या स्पर्धांच्या दरम्याने मिशन ऑलिंपिक 2032 -2036 या सदरा खाली खेळाडूंना वेगवेगळ्या तज्ञांचे मार्गदर्शनही सेमिनारच्या रूपाने देण्यात आले. फिजिओथेरपीस्ट मानसी बोरसाले तसेच सुमित आमलेकर व वैभव पवार या तज्ञांनी खेळाडूंना आहार, व्यायाम याबद्दल माहिती दिली. तसेच सर्वात लहान वयातीलअर्जुन अवॉर्डी कु.आदिती स्वामी, वर्ल्ड चॅम्पियन प्रथमेश जावकर व आंतरराष्ट्रीय मेडलिस्ट कु. शर्वरी शेंडे या खेळाडूंनी आपला जिल्हास्तरीय स्पर्धेपासून आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त करण्यापर्यंतचा प्रवास कसा झाला याबाबत सर्व खेळाडूंना महत्त्वपूर्ण माहिती दिली. या स्पर्धेतील हा एक आगळावेगळा व अतिशय माहितीपूर्ण उपक्रम ठरला, ज्याचा खेळाडूंना पुढील आयुष्यात खूप फायदा होणार आहे.

या स्पर्धा यशस्वी करण्याकरता व खेळाडूंची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून रत्नागिरी जिल्हा आर्चरी असोसिएशनच्या सचिवा समिधा झोरे, सहसचिव मार्तंड झोरे, खजिनदार प्रियदर्शनी जागुष्टे, उपाध्यक्ष सुमित गुजर यांनी अविश्रांत मेहनत घेतली असे अध्यक्ष श्री सुरेश साळवी यांनी सांगितले. तसेच या भव्य आणि दिव्य अशा स्पर्धा पार पाडण्याकरिता तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यासाठी श्री अभिजीत दळवी, सूरज खेबुडकर प्रलिषा, श्रीमंत कळणे, विवेक परीट, अरबाज खान, सोनल बोबडे, श्री बोबडे, प्रवीण गडदे, श्री साळुंखे, अशोक जंगमे या ऑफिशियल्सनी अतिशय मेहनत घेतली तसेच सेमिनार यशस्वी करण्याकरिता जिल्हा संघटनेला प्रवीण सावंत यांनी अतिशय मोलाचे सहकार्य केले. या स्पर्धेदरम्याने महाराष्ट्रातील १२ आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

अतिशय उत्तम नियोजन असल्याबाबतचे अभिप्राय अनेक खेळाडू व पालकांनी देऊन रत्नागिरी जिल्हा आर्चरी असोसिएशनचे आभार मानले. या स्पर्धेबद्दल बोलताना सचिवा समिधा झोरे यांनी सांगितले की एसव्हीजेसीटी डेरवण स्पोर्ट्स अकॅडमीचे स्पोर्ट्स डायरेक्टर श्री. श्रीकांत पराडकर सर यांचे आम्हाला अतिशय मोलाचे सहकार्य लाभले आहे. अतिशय उत्तम व उच्च दर्जाचे मैदान एसव्हीजेसीटीने उपलब्ध करून दिले. रत्नागिरी जिल्हा आर्चरी असोसिएशन या अकॅडमीची सदैव ऋणी राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button