मुद्रांक शुल्क माफच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने शिवसेनेची (शिंदे) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

रत्नागिरी : राज्य शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने ३० ऑक्टोबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे शासकीय कार्यालयासाठी लागणारे प्रतिज्ञापत्र, संमती पत्र, हमीपत्र किंवा शासनाच्या विविध कामासाठी बॉंण्ड पेपरवर करण्यात येणारे सर्व प्रतिज्ञापत्र हे साध्या कागदावर करण्याचे निर्देश केले आहे; मात्र याची अंमलबजावणी स्थानिक सेतू कार्यालयात होत नव्हती, अशा अनेक तक्रारी शिवसेनेला (शिंदे) प्राप्त झाल्या. याबाबत आज (५ मार्च) शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, शिवसेना तालुका प्रमुख बाबू म्हाप, शिवसेना नेते सुदेश मयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर जिल्हाधिकारी श्री. सूर्यवंशी यांची भेट घेऊन या शासन निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करण्याची मागणी करण्यात आली.

तसेच जिल्ह्यातील प्रत्येक सेतू केंद्रामध्ये फ्लेक्स बोर्ड लावून जनतेला माहिती देण्यात यावी व जनजागृती करण्यात यावी, अशी सूचनाही यावेळी करण्यात आल्या. या संदर्भात आपण तात्काळ कार्यवाहीचे आदेश देवू. तसेच ज्या ज्या सूचना केल्या आहेत त्यावर लेखी आदेश संबंधितांना देवू असे अप्पर जिल्हाधिकारी श्री. सुर्यवंशी यांनी सांगितले.याप्रसंगी माजी जि. प. अध्यक्ष आबा घोसाळे, विभाग प्रमुख शंकर झोरे, उपविभाग प्रमुख बाबा हळदणकर, उप तालुका प्रमुख राजू साळवी, विभाग प्रमुख स्वप्नील ऊर्फ तारक मयेकर, उपविभाग प्रमुख भिकाजी गावडे, मिरजोळे विभाग संघटक मजगांव सरपंच फैयाज मुकादम, पावस विभाग प्रमुख विजय चव्हाण, गोळप विभाग प्रमुख नंदा मुरकर, विशेष कार्यकारी अधिकारी सिध्देश शिवलकर, माजी सरपंच जितेंद्र शिरसेकर, विभाग प्रमुख प्रवीण पवार, विभाग प्रमुख प्रवीण पांचाळ, निवेंडी सरपंच सौ. रवीना कदम, खरवते संजय सकपाळ, दांडेआडम सरपंच कैलास तांबे, चांदेराई सरपंच योगेश दळी, जांभरुण सरपंच गौतम सावंत, गणपतीपुळे सरपंच सौ. कल्पना पक्ये, पिरदवणे सरपंच श्रीकांत मांडवकर, ओरी सरपंच स्वाती देसाई, केळ्ये सरपंच सौ. सौरभी पवार, हरचेरी सरपंच दत्ताराम येरीम, प्रीतम उर्फ मुन्ना घोसाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button