
राेहित शर्मा,शर्दूल ठाकूर यांचे प्रशिक्षक दिनेश लाड रत्नागिरीत,त्यांच्याशी झालेली बातचीत
-भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर व हरमीत सिंग तसेच मुंबई रणजी संघाचे आघाडीचे फलंदाज सिद्धेश लाड यांना घडवणारे त्यांचे प्रशिक्षक दिनेश लाड हे रत्नागिरीतील कै. छोटू देसाई क्रिकेट ॲकॅडमी येथे शालेय क्रिकेटपटूंना प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यासाठी रत्नागिरी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे आले असून त्यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी रोहित, शार्दूल,हरामीत यांना मी नाही तर त्यांच्याकडे गुणवत्ता असल्यामुळे ते घडले मी फक्त त्यांना मार्गदर्शन केले तसेच रोहित शर्मा हा बॉलिंग करायचा.पण नेट मध्ये बॅटिंगची प्रॅक्टिस करताना मी एक दिवस त्याला पहिले आणि त्याची गुणवत्ता माझ्या लक्षात आली त्यानंतर मी त्याला बॅटिंग वर जास्त वेळ दे असे सांगितले आणि त्यानेही खूप मेहनत घेतली आणि आज रोहित उदयास आला तो आपल्यासमोर आहे. परंतु हे गुणवान व मेहनती प्ल्येयर्स आहेत ते त्यांच्या टॅलेंटवर मोठे झाले त्यामुळे मी त्यांना घडवले असे म्हणणे योग्य नाही असेही ते पुढे बोलताना म्हणाले.
www.konkantoday.com