
जागतिक महिला दिनी मोफत बास्केटबॉल व तायक्वांदो प्रशिक्षण
रत्नागिरी, दि. ५ : जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी जिल्हा क्रीडा संकुलात मोफत बास्केटबॉल व तायक्वांदो प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील सर्व महिलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.
भारतीय खेळ प्राधिकरण, क्षेत्रीय केंद्र, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा क्रीडा परिषद आणि बास्केटबॉल व तायक्वांदो जिल्हा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व महिलांकरिता मोफत बास्केटबॉल प्रशिक्षण सकाळी ८ ते ११ या वेळेत व तायक्वांदो प्रशिक्षण सायंकाळी ५ ते ८ या वेळेत येथील जिल्हा क्रीडा संकुल, मारुती मंदिर येथे आयोजित करण्यात आले आहे. 000