
उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी : डॉ.अनिरुद्ध आठल्ये*m
रत्नागिरी : सध्या वातावरणातील उष्म्याचे प्रमाण वाढत असून, नागरिक हैराण झाले आहेत. नागरिकांना उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.**सध्या उन्हाळा सुरु असून दिवसेंदिवस वाढत्या तापमानामुळे व आद्रतेमुळे उन्हात फिरणाऱ्या व्यक्तीला उष्माघात होण्याची शक्यता असते. सध्या शेतमजूर आणि कामगार उन्हाची पर्वा न करता उन्हामध्ये राबतात. त्यामुळे त्यांना उष्मघाताचा फटका बसण्याची सर्वाधिक शक्यता असते.
उष्माघात होण्याची कारणे*जास्त उन्हात शारीरिक श्रमाची, अंग मेहनतीचे व कष्टाची कामे करणे, कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम करणे, जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे, घट्ट कपड्यांचा वापर करणे, अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संपर्क येण्याने उष्माघात होऊ शकतो.*उष्माघात लक्षणे :*मळमळ, उलटी, हात पायात गोळे येणे, थकवा येणे, ९७ टक्के (फॅरेनहाईट) पेक्षा जास्त ताप येणे, त्वचा गरम होणे व कोरडी पडणे ,क्वचित लाल होणे, घाम न येणे, डि-हायड्रेशन, चक्कर येणे, निरुत्साही वाटणे, डोके दुखणे, छातीत धडधड होणे,रक्तदाब वाढणे,मानसिक अस्वस्थ, बेशुद्धवस्था आदी.
लहान मुले, गरोदर महिला, खेळाडू, सतत उन्हात काम करणाऱ्या व्यक्ती, वयस्कर व्यक्ती ज्यांना हृदय रोग, फुप्फुसाचे विकार, मूत्रपिंडाचे विकार आहेत.
*प्रतिबंधात्मक उपाय :
काय करावे पुरेसे पाणी प्या. तहान लागली नसली, तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्या. घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करा. सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे आणि झडपांचा वापर करा. उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टीव्ही किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा. हलकी, को
पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. उन्हात काम करीत असल्यास टोपी, छत्री किंवा ओल्या कपड्याने डोके, मान, चेहरा झाकावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनवण्यात आलेली लस्सी, कैरीचे पन्हे, लिंबू पाणी, ताक आदींचा वापर नियमित करावा. अशक्तपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम आदी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा. गुरांना छावणीत ठेवण्यात यावे. तसेच त्यांना पुरेसे पाणी पिण्यास देण्यात यावे. घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात. पंखे, ओले कपडे याचा वापर करण्यात यावा. शक्य असल्यास घरामध्ये कामाच्या ठिकाणी कुलर्स, एअर कंडिशनर्स यांचा वापर करावा. थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.
कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असताना करावीत. गरोदर स्त्रिया आणि आजारी कामगारांची अधिक काळजी घेण्यात यावी. उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा.
काय करू नये :
उन्हात अति कष्टाची कामे करू नका. दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेये घेऊ नका. दुपारी बारा ते तीनच्या तीव्र उन्हाच्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळा, सूर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करावे. वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळणे व शक्य नसल्यास थोड्या वेळाने सावलीत विश्रांती घेऊन पुन्हा काम करावे. उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नका,लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये,गडद घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे, उष्णता शोषून घेणारे कपडे (काळ्या किंवा भडक रंगाचे) वापरू नयेत,बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी.
*उपचार :*
रुग्णास प्रथम सावलीत आणावे. रुग्णाचे तापमान कमी करण्यासाठी त्वरित उपचार सुरू करावेत. रुग्णाचे कपडे सैल करून त्वरित अंग थंड पाण्याने शरीराचे तापमान कमी होईपर्यंत पुसत राहावे. रुग्णास हवेशीर व थंड खोलीत ठेवावे, खोलीतील पंखे, कुलर्स, एअर कंडिशनर्स त्वरित चालू करावेत. रुग्ण शुद्धीवर आसल्यास त्यास थंड पाणी, जल संजीवनी द्यावे.चहा,कॉफी देवू नये. रुग्णाच्या काखेखाली आइस पॅक ठेवावेत, रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याचा पट्टया ठेवाव्यात. थर्मामीटरने रुग्णाचे तापमान बघत राहावे व ९७°F (फॅरेनहाईट) साधारण तापमान होईपर्यंत वरील उपचार चालू ठेवावेत. नजीकच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा. रुग्णास रुग्णालयात भरतीची गरज पडल्यास १०८ ॲम्ब्युलन्ससाठी कॉल करावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.