
गृहरक्षक दलामध्ये झालेल्या बदलीविरोधात व सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली
मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून हटवून गृहरक्षक दलामध्ये झालेल्या बदलीविरोधात परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आपली बदली बेकायदेशीर असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्याचबरोबर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरही त्यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला असून त्याप्रकरणी सीबीआय चौकशी केली जावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात १३० पानांची रिट याचिका दाखल केली आहे.
www.konkantoday.com