IRCTC आणि IRFC यांना मिळाला नवरत्न दर्जा!

नवी दिल्ली – इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) 25 वी आणि इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (IRFC) 26 वी नवरत्न कंपनी बनली आहे. सरकारने सोमवारी (3 मार्च) या दोन्ही कंपन्यांना नवरत्न सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्रायझेसमध्ये अपग्रेड केले.*नवरत्न दर्जा मिळाल्याने रेल्वे क्षेत्रातील या दोन कंपन्यांना अधिक आर्थिक स्वायत्तता मिळेल. आता या कंपन्या सरकारच्या परवानगीशिवाय 1,000 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतील. त्यामुळे त्यांच्या निर्णयक्षमतेला गती मिळेल.

माझगाव डॉकला जुलै 2024 मध्ये ‘नवरत्न’ दर्जा मिळाला*यापूर्वी जुलै 2024 मध्ये, Mazagon Dock Shipbuilders नवरत्न कंपन्यांच्या गटात समाविष्ट करण्यात आले होते. सप्टेंबरमध्ये सतलज जल विद्युत निगम, नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन, सोलर एनर्जी कॉर्पोरेशन आणि रेलटेल कॉर्पोरेशन यांना ‘नवरत्न’ दर्जा मिळाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button