
हत्येच्या दिवशी संतोष देशमुखांचा उपवास, पोटात अन्न-पाणी नाही, सहा जणांनी क्रूरपणे मारल.
संतोष देशमुख यांची हत्या कशी झाली याचे वर्णन आतापर्यंत सांगितलं जात होतं. पण आता त्यांच्या हत्येच्या वेळेचे फोटो समोर आले आहेत. ते फोटो पाहिल्यानंतर अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाहीत.सीआयडीने जे चार्जशिट दाखल केले आहे, त्यामध्ये या फोटोंचा समावेश करण्यात आला आहे. ज्यावेळी हत्या करण्यात येत होती, त्यावेळेस त्यांचे व्हिडीओ काढले गेले. ते व्हिडीओ सीआयडीच्या हाती लागले आहेत. याच व्हिडीओचे स्क्रीनशॉर्ट घेऊन फोटोंचा चार्जशीटमध्ये समावेश करण्यात आलाय.केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर अनेक नवीन गोष्टी समोर येत आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील टोळी पुरती अडकणार असल्याचे दिसून येत आहे.पोलिसांनी वाल्मिक कराड आणि इतरांविरोधात एक, दोन नव्हे तर जवळपास 66 पुरावे जमवले आहेत. या चार्जशीटमध्ये पुरावे म्हणून हत्येच्या वेळची काही दृश्य, फोटो जोडली आहेत. यातून हत्येची क्रूरता दिसून येत आहे.वाल्मिक कराडच संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाईंड असल्याचे समोर आले आहे. खंडणी, ॲट्रॉसिटी हत्या हे तिन्ही प्रकरण एकत्रित केले असून तिन्ही प्रकरण एकाच कारणातून घडल्याचा आरोप ही दोषारोप पत्रात करण्यात आला आहे. कट कुठे रचला याची माहिती आणि पुरावे सीआयडीच्या हाती लागले आहेत.कोणाचही रक्त सळसळेल असे 10 फोटोजनावराप्रमाणे मारहाण केल्यानंतर जयराम चाटेने संतोष देशमुखांची पँट काढली.त्यावेळी दुसरा आरोपी महेश केदार हा देशमुखांची पँट काढताना त्याचा सेल्फी घेत होता.
अमानुष मारहाणीनंतर प्रतीक घुलेने देशमुखांच्या छातीवर दोन्ही बाजूला पाय टाकून चेहऱ्यावर लघवी करतोयमारहाणीनंतर संतोष घुले देशमुखांच्या शेजारी उभा राहून फोटो काढतो.जयराम चाटे देशमुखांच्या अंगावरचा शर्ट ओढून काढते आणि हातात धरून फिरवतो.मारेकरी लाथा, बुक्क्या, पाईप आणि वायरने देशमुखांना मारहण करतात तसेच शिवीगाळ करतात.वायरीसारख्या हत्याराचं बंडल देशमुखाच्या पाठीवर मारून वार केलेसंतोष देशमुख मोठ्याने ओरडत असताना महेश केदार त्याचा व्हिडीओ घेत होतासुदर्शन घुले हा सगळ्यांचा बाप आहे, असं देशमुखांना म्हणावं यासाठी जबरदस्ती केली जातेसंतोष देशमुखांना फक्त अंतर्वस्त्रावर बसून पाठीवर पाईपने मारहाण केली जात होती संतोष देशमुख हत्याप्रकरणातील चार्जशीटमध्ये हे फोटो जोडण्यात आले आहे. आरोपी मारहाण करतानाचे कोणतेही फोटो आणि व्हिडीओ अद्याप समोर आलेले नाही. मात्र ते फोटो आणि दृश्य कोणती आणि काय होती? या संदर्भातील माहिती समोर आलेली आहे.
कृष्णा आंधळेची मोकारपंती असा या व्हाट्सअॅप ग्रुपचं नाव होते. या ग्रुपमध्ये 5 ते 6 जणांनी संतोष देशमुख यांना कसं मारहाण होते हे पाहिले होते. फॉरेन्सिककडून हा व्हिडिओ सीआयडीला मिळाल्यानंतर त्याचे छोटे छोटे 10 ते 12 व्हिडिओ तयार झाले आणि त्यातूनच या व्हिडीओमधील व्यक्ती आणि सीआयडीने या प्रकरणात ताब्यात घेतलेली व्यक्ती यांची फॉरेन्सिक तपासणी झाली. या व्हिडिओतील काही फोटो हे या आरोपपत्रात जोडण्यात आले आहेत.