
दापोली बुरोंडी येथील होमक्वारंटाइन मृत पावलेल्या व्यक्तीचा कोरोना टेस्ट अहवाल निगेटिव्ह,दापोलीकरांना दिलासा
दापोली बुरोंडी येथील होम क्वारंटाइन करून ठेवलेल्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला होता.ही व्यक्ती काही दिवसांपूर्वी मुंबई घाटकोपर येथून गावी बुरोंडी येथे आली होती.या व्यक्तीला होम क्वारंटाइन करून ठेवण्यात आले होते.दरम्यान परवा रात्री या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला त्यामुळे दापोली प्रशासनात धावपळ उडाली होती.या व्यक्तीचा मृत्यू अन्य कारणामुळे झाला असला तरी खबरदारी म्हणून या व्यक्तीची कोरोना टेस्ट तपासणीसाठी पाठवण्यात आली होती.मात्र या व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
www.konkantoday.com