
महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब.
महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सदस्यांच्या बैठकीत यासंदर्भात ठरवा संमत झाला.यानंतर विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्याकडे हे शिफारसपत्र पाठवण्यात आले.
भास्कर जाधवांची राजकीय कारकीर्द–
भास्कर जाधव 1982 पासून शिवसेनेत–
1995 ते 2004 दरम्यान चिपळूणमधून दोन वेळा आमदार–
2004 – शिवसेनेला सोडचिठ्ठी
— 2006 – महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य-
– 2009 – राष्ट्रवादीतून विधानसभा निवडणूक लढवत विजयी– काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात नगरविकासमंत्री
— 2013 – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष–
2014 – महाराष्ट्र विधानसभा सदस्य म्हणून विजयी-
– 2019 निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश–
2019 आणि 2024 निवडणुकीत शिवसेनेचे आमदार
भास्कर जाधव कोकणातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एकमेव आमदार आहेत. भास्कर जाधव पक्षात नाराज असल्याची चर्चा काही दिवसांपुर्वी रंगली होती. त्याला कारणही तसंच होतं. क्षमतेप्रमाणे मला काम करण्याची संधी मिळाली नाही. हे माझं दुर्दैव असल्याची खंत भास्कर जाधवांनी व्यक्त केल्याने चर्चांना उधाण आले होते. दरम्यान त्यांना विरोधी पक्षनेते पद देऊन योग्य सन्मान राखला गेल्याचे आता म्हटले जात आहे.गेले काही दिवस एक प्रश्न विचारला जात होता.
आज शिवसेनेने विरोधी पक्षनेते पदावर दावा केला आहे. पुढची वाटचाल आम्ही करणार आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. एकत्रित निर्णय घेऊन आम्ही पुढे जाऊ. येत्या अर्थसंकल्प आधी विरोधी पक्षनेता बसवला पाहिजे असे ते म्हणाले. भाजपला आदित्यचं नाव हवं होतं हे जर समजलं असतं तर बरं झालं असतं. घराणेशाही त्यांना चालतं हे समजलं असतं, असा चिमटा त्यांनी भाजपला काढला.