
फडणवीसांनी अजित पवारांसमोरच मागितला धनंजय मुंडेंचा राजीनामा?;
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगितला असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे आहे
सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचे धक्कादायक फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर सोमवार सायंकाळपासूनच महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये मुंडेंच्या राजीनाम्याची चर्चा सुरु झाली होती. यासंदर्भात रात्री उशीरा मुंबईत अजित पवारांच्या बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीमध्ये फडणवीसांनी धनंजय मुंडेंना राजीनामा देण्यास सांगितलं आहे. धनंजय मुंडेंचा राजीनामा आजच घातला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. रात्री अजित पवारांच्या ‘देवगिरी’ बंगल्यावर झालेल्या बैठकीमध्ये अजित पवार आणि फडणवीस या दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झालं आहेकाल रात्री ‘देवगिरी’ बंगल्यावर झालेल्या बैठकीत धनंजय मुंडेंना स्पष्ट शब्दांमध्ये ‘राजीनामा द्या’ असं सांगितलं आहे. त्यामुळे धनंजय मुंडे आज राजीनामा देणार हे जवळपास निश्चित झालं आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरुन सातत्याने धनंजय मुंडे आणि राज्य सरकारवर टीका होत होती. धनंजय मुंडेंनी या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराडला पाठबळ दिली. मुंडेंनी वाल्मिकला पाठबळ दिलं आणि त्याच्या इशाऱ्यानेच हे हत्याकांड झाल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भातील अनेक पुरावे समोर आल्यानंतर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात होती