
दापोली शहरातील आसर्याच्या पुलावर पर्यटकांच्या वाहनाने धडक दिल्याने विद्यार्थीनी जखमी.
दापोली शहरातील आसर्याच्या पुलावर शनिवारी सायंकाळी झालेल्या अपघातात रस्त्याने चालत जाणार्या दोन २० वर्षीय विद्यार्थीनी किरकोळ जखमी झाल्या. शनिवारी सायंकाळच्या सुमारास महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी रस्त्याने चालत जात असताना मागील बाजूने वेगाने येणार्या पुणे येथील पर्यटकांच्या गाडीने त्यांना धडक दिली. यात दोन्ही विद्यार्थीनी किरकोळ जखमी झाल्या. त्यांना दापोली उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.www.konkantoday.com