
रत्नागिरी शहरातील बोर्डींग रोड येथील विवाहित महिलेची आत्महत्या.
रत्नागिरी शहरातील बोर्डींग रोड येथील विवाहित महिलेने साडीने गळफास घेतला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
निकिता गौतम तुपेरे (वय ४०, रा. मिशन कॅम्प, बोर्डिंग रोड, रत्नागिरी) असे गळफास घेतलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. २) सकाळी साडेनऊच्या सुमारास निदर्शनास आली.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार निकीता तुपेरे हिने कोणत्यातरी अज्ञात करणाने घराच्या वरच्या माळ्यावरील रुममधील लाकडी भाळाला (वाशाला) नायलॉनची साडी बांधून गळफास घेतला. नातेवाईकांनाच्या लक्षात आल्यावर तात्काळ तिला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु असताना सकाळी साडेदहाच्या सुमारास जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.