श्री.संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मराठी भाषेच्या कार्याच्या प्रित्यर्थ आळंदी मध्ये पुढील वर्षीपासून भव्य कीर्तन महोत्सव भरवणार :- मंत्री डॉ.उदय सामंत.

श्री.संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती आयोजित विद्यार्थ्यांच्या मूल्यसंवर्धनासाठी “ओळख श्री ज्ञानेश्वरीची व परिचय भागवत धर्माचा” हा पुस्तक प्रकाशन सोहळा राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी हा कार्यक्रम माझ्या दृष्टीने फार मोठा कार्यक्रम असून आपण ज्या ग्रंथाच प्रकाशन करतो ते ग्रंथ खूप ताकतीचे ग्रंथ आहेत आणि त्याच प्रकाशन मी करतोय हे माझं परमभाग्य आहे आणि याच मला समाधान आहे अशी भावना यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी व्यक्त केली.खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची संस्कृती पाहायची असेल तर संतांच्या भूमीत आलं पाहिजे. माझ्या आयुष्याच्या दृष्टीने संत ज्ञानेश्वरांच्या भूमीतील कार्यक्रम अतिशय भाग्याचा क्षण आहे. हे पुस्तकं प्रकाशन करताना पुस्तकं वाचली पाहिजेत, संत साहित्य म्हणजे अभिजात भाषा आहे, संत ज्ञानेश्वर महाराजांची भाषा ही फक्त अभिजात भाषा नाही तर जगातील सर्व भाषांना मागे टाकणारी भाषा आहे असा विश्वास यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी व्यक्त केला.मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी महत्वाचं काम केल आहे आणि ते म्हणजे संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आम्ही ई-बुक मध्ये आणली आहे.

ज्ञानेश्वरी वाचता आली पाहिजे आणि ऐकताही आली पाहिजे, संत तुकाराम महाराजांची गाथा पण आपण ई-बुक मध्ये आणणार आहे. संपूर्ण संत साहित्य आपण ई-बुक मध्ये आणण्याचा प्रयत्न करणार आहे आणि हे संत साहित्य पुढच्या पिढीत नेण्याच काम आम्ही करणार आहोत असे आश्वासन यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी दिले.माझ्या मनात आलेली संकल्पना म्हणजे पुढील काळात आपण बाल साहित्य, महिला साहित्य व युवा साहित्य संमेलन आपण भरविणार आहे आणि त्याचाच पुढचा भाग म्हणजे वारकरी संप्रदायासाठी पुढच्या वर्षीपासून आळंदी येथे भव्य कीर्तन महोत्सव भरवणार आहे. ज्या संत ज्ञानेश्वर माऊलींनी मराठी भाषा काय आहे हे जगाला दाखविली त्याच भूमीत हा कीर्तन महोत्सव यशस्वी करू शकलो तरच आपण काहीतरी मराठी भाषेसाठी करू शकलो असे मला वाटेल आणि या कीर्तन महोत्सवाची दखल जगाने घेतली पाहिजे असा कीर्तन महोत्सव आपण करणार आहोत असे प्रतिपादन यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी केले.

आळंदी परिसरासाठी जो काही विकासनिधी प्रलंबित आहे तो पुढील काळात लवकरात लवकर मिळवून देऊ असे आश्वासन यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी दिले. संत ज्ञानेश्वरांचे विचार याच परिसरापुरते मर्यादित न राहता जगभरात हे विचार पोहचविणे गरजेचे आहे आणि देवस्थानने यासाठी पुढे पाऊले टाकावीत, सरकार म्हणून आम्ही तुमच्या मागे सक्षमपणे उभे राहू असा विश्वास मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी यावेळी दिला. जसे आपण विविध भाषा शिकतो तसेच आपली मराठी भाषा पण सर्वत्र शिकवली गेली पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे आणि त्याचसाठी वारकरी संप्रदायाने पुढे यावे असे आवाहन मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी वारकऱ्यांना केले.

विधानसभा अधिवेशन काळात आपण सर्वजण एकत्र बैठक घेऊन आपल्या मराठी भाषेसाठी काय करता येतील यासाठी प्रयत्न करूयात, तसेच जसे शरीर तंदुरुस्त राहील पाहिजे तसे मन तंदुरुस्त राहावं यासाठी वारकरी संप्रदायाने पुढे यावे आणि त्यासाठी राज्य सरकार आपल्यापाठीमागे सर्वप्रकारे सोबत राहील असा शब्द मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button