
राज्यातील ठेकेदारांची सुमारे 89 हजार कोटींची बिले थकीत-माजी आ. परशुराम उपरकर.
लाडक्या बहीण योजनेला मोठ्या प्रमाणावर निधी लागत असल्याने राज्यातील ठेकेदारांची सुमारे 89 हजार कोटींची बिले थकीत आहेत. सिंधुदुर्गचा विचार करता सार्वजनिक बांधकाम, पंतप्रधान ग्रामसडक, मुख्यमंत्री ग्रामसडक, पतन, खारभूमी, जि.प. बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा यांच्या मार्फत झालेल्या विविध विकासकामांची सुमारे सव्वादोनशे कोटींची बिले रखडली आहेत.
राज्याच्या तिजोरीत खडखडाट असून हे पैसे लवकरच मिळण्याची शक्यता धुसर आहे. त्यामुळे अनेक ठेकेदारांनी नवीन कामे करण्यास नकार दिला आहे. पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातील आनंदवाडी प्रकल्प पूर्ण करण्यासही ठेकेदाराकडे पैसे नाहीत, असा आरोप ठाकरे शिवसेनेचे नेते माजी आ. परशुराम उपरकर यांनी केला.